Learn Mindfulness Meditation in Marathi

हा इ -वर्ग आपल्याला दैनंदिन जीवनात सजगता ध्यान शिकण्यासाठी आणि यशस्वीपणे ताणतणाव हाताळण्यासाठी मदत करेल.

Learn Mindfulness Meditation in Marathi
Learn Mindfulness Meditation in Marathi

Learn Mindfulness Meditation in Marathi udemy course free download

हा इ -वर्ग आपल्याला दैनंदिन जीवनात सजगता ध्यान शिकण्यासाठी आणि यशस्वीपणे ताणतणाव हाताळण्यासाठी मदत करेल.

सजगता ध्यानाच्या या वर्गात आपले स्वागत आहे. सजग व्हायचे, म्हणजे आपले लक्ष वर्तमानात आणायचे आणि त्या क्षणी बाह्यविश्वात आणि अंतर्विश्वात काय होते आहे ते जाणायचे. ध्यानाचे मुख्य चार प्रकार खालील प्रमाणे आहेत.. आपण पुढील काही दिवसात या ध्यानाचा अभ्यास करणार आहोत .


१. एकाग्रता ध्यान (Focused Attention Technique)


२. सजगता ध्यान (Open Attention Technique)


३. कल्पना दर्शन ध्यान (Visualization Technique)


४. करूना ध्यान (Compassion Meditation)


प्रत्येक अभ्यास हा ऑडिओ क्लिप मध्ये उपलब्ध आहे. एकदा ऑडिओ एकूण अभ्यास केल्यानंतर , रोज त्या प्रकारचे ध्यान किमान दहा मिनिट करायचे आहे .

कोर्स सुरू करण्यापूर्वी आणि नंतर आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता असलेल्या काही गोष्टी खाली दिल्या आहेत. त्या लक्ष्यात ठेवाव्यात.

१. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर देखील आपल्याला ध्यानाचा सराव सुरू ठेवावा लागेल. अन्यथा आपली विचारांची आणि भावनांवरील प्रतिक्रिया पूर्वीसारखीच असेल.

२. घाईत प्रत्येक ध्यानाचा सराव पूर्ण करू नका, हळू हळू एकामागून एक ध्यान प्रकाराचा सराव करा .

३. सुरूवातीस आपल्याला हा सराव कंटाळवाणा वाटेल परंतु विश्वास ठेवा. हळू हळू जेव्हा आपण तंत्र शिकता तेव्हा चित्र स्पष्ट होईल.

४. माइंडफुलनेस मेडिटेशनचा चा अर्थ असा नाही की आपल्याला प्रत्येक वेळी विश्रांती, शांतता किंवा आनंद मिळेल. ध्यान करण्यामध्ये अनेक प्रकारच्या भावनांचा समावेश असतो, केवळ छानच नव्हे तर नकारात्मक भावना देखील आपल्याला अनुभवायला येतात. त्यांच्याकडे सजगतेने पाहायला शिकायचे आहे.

५. काहीवेळा असे होऊ शकते की ध्यान करताना मनात अप्रिय भावना उद्भवू शकतात आणि आपण त्यांचा सामना करण्यास अक्षम ठरू शकतो , अशावेळी आपण अयशस्वी झाल्याची भावना न बाळगता ध्यान हळूवारपणे थांबवा. दिवसेंदिवस जेव्हा त्या अप्रिय संवेदनांवरील आपली प्रतिक्रिया कमी होईल, तस काही काळानंतर ती भावना यापुढे तुमचे नुकसान करणार नाही. (ती भावना तुमच्या मनात असू शकते परंतु त्यांची शक्ती कमी असेल)

६. माइंडफुलनेस ही कुठली जादू नाही जी आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करते. हे एक कौशल्य आहे जे आपल्याला नेहमी जागरूक राहण्यास शिकवते. या जागृकते मुळे अपल्याला आपल्या भावना आणि विचार चांगल्या प्रकारे समजू शकतात. म्हणून आपण त्यांना स्वीकारू शकू आणि जीवन जगण्याचा एक स्वस्थ दृष्टीकोन तयार करू शकू .

७. जेव्हा शरीर आणि मन शांतता स्थितीत असते, तेव्हा मेंदू तणाव संप्रेरक सोडणे थांबवतो . ज्या लोकांनी ध्यानधारणा केली ते तणाव अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतात..


८. आपण आधीपासून एखाद्या समुपदेशक किंवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यास कृपया त्यांना कळवा की आपण या कोर्समधून जात आहात, जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवल्यास ते आपल्याला मदत करू शकतात.